Skip to main content

दैवी दान

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 24/04/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना ही आज माझी - अंतरीची साद आहे देह माझा चंदनी अन चित्ती तुझा नाद आहे । जगताना जगले असे मी ध्यास तुझा घेउनी उमगले अंती आता - श्वास माझा तूच आहे । दिवस चालती काळोखाला सांगाती घेउनी रवी-शशी नभी असता अंधाराचे नाव आहे । सतत वर्षती अमृतधारा परोपरी धरेवरी अंतरी स्मरणांचा धगधगणारा दाह आहे । वाटेवर चालता मिळे काटेरीच पखरण ही रंग गंधी फुलाफुलांचा गाव तर दूर आहे । चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे । डोळ्यांनी माझीया आजही, घात माझा केला सांगितले सार्‍यांना की दुः खाचा हा घाव आहे । र्‍हुदयीच्या जखमा अशा अलवार मी त्या जपल्या बोल कशी लावू ? - मम दैवाचे ते दान आहे ।
लेखनविषय:

वाचने 2055
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्त गजल. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

हो नक्की लक्षं देइन.. पहीलाच प्रयत्न होता ..

In reply to by अश्विनि३३७९

चुकुन प्रतिक्रिया प्रतिक्षित झाली.. चुक भुल द्यावी घ्यावी ..

In reply to by अश्विनि३३७९

तुमचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे .. लिहित रहा ..

चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे । व्वा.छानच... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

मनःपूर्वक आभार !

कविता एकदम मस्त आहे. :)