Skip to main content

या गर्द नील नयनी... दाटुन मेघ आले...

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 21/04/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
या गर्द नील नयनी... ! काही दिवसांपुर्वी प्राजु ने एक कविता पुर्ण करायला सांगितली होती.. मला त्यावर जे सुचले ते मी लिहीलेय.. या गर्द नील नयनी.. दाटून मेघ आले.. का मोर पापण्यांचे.. मिटवून पंख बसले... क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी.. परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले.. [१] सखये स्मृतीत तुझिया.. बावरा भ्रमर मी झालो.. भिरभिरलो तुज शोधाया.. विरहात श्वास तुटले.. [२] हा मंद धुंद वारा.. अन गंधीत रातराणी... हा चंद्र हेच तारे... मज छळावयास उरले... [३] व्याकुळल्या मनाला... आता तुझीच आस... ओठी तुझेच नांव.... चित्ती तुलाच स्मरले... [४] -चंद्रशेखर.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2038
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

क्षण एक का असेना.. आस हिच.. तु दिसावी.. परि प्रिया न आली माझी..ओठांत गीत रुसले हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु, लवंगी, क्रांती आणि चंद्रशेखर जी आपणा सर्वांचे...... मनापासुन आभार !

मस्त ! तुम्ही पण शिकला की गाळलेल्या जागा भरायला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

चंद्रशेखर, छान झालीये कविता! सालो

परा... सालोमालो..आणि जयवि... खुप आभार !