Skip to main content

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?
लेखनविषय:

वाचने 1766
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

पौर्णिमा आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

>>खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, >>सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना खुप सुंदर! -अनामिक

अप्रतिम... मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना? सुरेखच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/