Skip to main content

पौर्णिमा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 13/04/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का? हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का? बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी, होऊन धार मजला, तू चिंब करशील का? दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला होऊन रातराणी श्वासात उरशील का? भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का? दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का? हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे घेऊन ते उराशी साकार करशील का? - प्राजु
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3986
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वा ! सोमवार सकाळ साजरी झाली ! हा आठवडा छान जाणार हे नक्की !! :) --अवलिया

दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का? वा प्राजुतै मस्तच कविता ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

सुंदर ! आता जरा व्यवस्थीत कळाले, एका शब्दामुळे अडखळलो होतो ;) कोण ती म्हणते आहे तोंडावर पडलो होतो =))

बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? मस्तच ग प्राजु ... -स्मिता

पुरुषाच्या नजरेतुन लिहलेली कविता छानच. छान प्रयोग आहे हा.

वा, प्राजु. अवो एवढं मायेनं ईचारल्यावर नाय म्हनायला ती काय येडी का खुळी? अवो हातच काय तुमालाच धरल आख्खी .

करशील का?,होशील का?,धरशील का?,स्मरशील का?....बापरे..केव्हढे प्रश्ण?? प्रियकरगोंधळुनजाईल..प्रश्णांचि सरबत्ति ऎकुन......पण कविता छान आहे....

कविता मस्तच आहे.
बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?
छानच! --शाल्मली.

>> बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? या ओळी अगदी समर्पक आहेत.

सुंदर, अतिसुंदर काव्य.असे पुन्हा होणे नाही. माझी आई डाळीची आमटी चवदार करायची.रोज मी तिला म्हणायचो, "किती चवदार आमटी केलीस.अशी पुन्हा होणारच नाही." पण पुन्हा केल्यावर तसंच वाटायचं "अशी पुन्हा होणारच नाही." तसंच तुझ्या कवितेचं आहे.असं मला वाटतं. कवितेतला सजणा म्हणतो, "दिवसा कैक वेळां वाचतो तुझीच गीते अशीच अनेक गीते तू लिहशील का?" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

कवयत्रीची पुन्हा एक सुंदर कविता ! आणि सामंतसाहेबांचा तितकाच सुंदर प्रतिसाद. -दिलीप बिरुटे

काय रोमॅण्टीक कविता/गझल आहे.. वाह! :X बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी, होऊन धार मजला, तू चिंब करशील का? हे खास आवडलेत! राघव

वाव्वा! कल्पना छानच आहेत. कविता आवडली. रातराणी तर मस्तच आहे. पौर्णिमाही आवडली. मात्र वृत्तभंगाचे गालबोट लागून कविता गुणगुणताना अडखळलो :( (आस्वादक)बेसनलाडू

तुझ्या कविता नेहमिच सुंदर असतात... प्राजु... !!

प्राजु मस्त कविता.... यावरून एक आठवण.. माझ्या मैत्रिणीला जेव्हा तीचा नवरा (लग्नाअगोदर) पाहायला आला होता. तेव्हा त्याने तिला एकामागोमाग एक असे एकूण ३०/३५ प्रश्न विचारले होते.... तिला वाटले कि, आपण नोकरीचा इंटरव्ह्यू देत आहोत..... शेवटी विचारले तुला काही विचारायचे आहे का?..... :) तिने एकही प्रश्न विचारला नाही...... :) आता विषय निघाला कि म्हणते...मला त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊनच कंटाळा आला होता.... :)