गुलाम!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझा जन्म दु:ख माझे
अष्ट्पुत्रा! शाप माझे!
माझा कळप पुरुषी
येथे स्थान काय तुझे?
तुझे अर्थार्जन माझे
तुझे प्रजनन माझे
श्वास घे तू जगण्यापुरते
मात्र नियंत्रण माझे!
संतती! पौरूष माझे
कन्यादान पुण्य माझे!
घरा येता अवकळा
मग पांढरे पाय तुझे!
असो पोकळ पौरूष
कर पूजन तू माझे
तुझ्या अस्तित्वी पहारा
तुझ्या मागे नाव माझे!
तुझे तनमन माझे!
तुझे प्राण आत्मा माझे
आला जरी कधी यम
आण परत प्राण माझे!
मंगळसूत्र! चिन्ह माझे!
बाळग जाणिवेचे ओझे!
ताट वाढ आधी मला
जे उरेल ते तुझे!
तू लक्ष्मी? धन माझे
जे जे तुझे ते ते माझे
चल! कर तू घर स्वर्ग!
सिंहासन मात्र माझे!
तुझे सात जन्म माझे
मान उपकार माझे!
परत आठव्या जन्मी
गुलाम! होईल कोणी माझे!!
कविता
वाचने
2317
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
इतक्या मोजक्या शब्दांत इतकी नेटकी वस्तुस्थिती मांडणे ही खरच कमाल आहे! अप्रतिम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
अतिशय कमी शब्दांत.. पोकळ पौरूषत्वाची छान मांडणी केली आहेस. वस्तुस्थिती आहे.
संतती! पौरूष माझे
कन्यादान पुण्य माझे!
घरा येता अवकळा
मग पांढरे पाय तुझे!
तुझे तनमन माझे!
तुझे प्राण आत्मा माझे
आला जरी कधी यम
आण परत प्राण माझे!
या ओळी अत्युच्च!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to जबरदस्त!!! by प्राजु
असेच म्हणतो.
हीच दोन कडवी सगळ्यात जास्त भिडलीत.
अजून येऊ द्यात.
राघव
संतती! पौरूष माझे
कन्यादान पुण्य माझे!
घरा येता अवकळा
मग पांढरे पाय तुझे!
तुझे तनमन माझे!
तुझे प्राण आत्मा माझे
आला जरी कधी यम
आण परत प्राण माझे!
--- हे तर उत्कॄष्टच !
बस्स्स ! माझे शब्द संपले !! खूप छान , उत्तम....वगैरेच्या पलिकडली कविता.
अजून येऊद्यात !!
तुझे तनमन माझे!
तुझे प्राण आत्मा माझे
आला जरी कधी यम
आण परत प्राण माझे!
सुंदरच... :)
मदनबाण.....
जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
जालावरुन सभार...
कविता आवडली ..
वास्तवाचे नेमके वर्णन आहे ...
तुझे सात जन्म माझे
मान उपकार माझे!
परत आठव्या जन्मी
गुलाम! होईल कोणी माझे!! ............ हे खासच !
बंडखोर कविता आहे.
जवळजवळ सर्वच कडवी हिसका देणारी आहेत.
In reply to जळजळीत by धनंजय
धनंजय शी सहमत !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वास्तववादी कविता.
कविता आवडली. :)
वास्तववादी मार्मिक कविता.
उको.... मिपावर स्वागत ! छान :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
माबो. वर प्रतिक्रिया दिली आहेच. छान.
कविता भारी आहे. आवडली. कवितेत वर्णन केलेली स्थिती मात्र तापदायक !
-- लिखाळ.
!!!!!!!!!!!!!!!!!!!