Skip to main content

गुलाम!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 29/03/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा जन्म दु:ख माझे अष्ट्पुत्रा! शाप माझे! माझा कळप पुरुषी येथे स्थान काय तुझे? तुझे अर्थार्जन माझे तुझे प्रजनन माझे श्वास घे तू जगण्यापुरते मात्र नियंत्रण माझे! संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! असो पोकळ पौरूष कर पूजन तू माझे तुझ्या अस्तित्वी पहारा तुझ्या मागे नाव माझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! मंगळसूत्र! चिन्ह माझे! बाळग जाणिवेचे ओझे! ताट वाढ आधी मला जे उरेल ते तुझे! तू लक्ष्मी? धन माझे जे जे तुझे ते ते माझे चल! कर तू घर स्वर्ग! सिंहासन मात्र माझे! तुझे सात जन्म माझे मान उपकार माझे! परत आठव्या जन्मी गुलाम! होईल कोणी माझे!! कविता
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2333
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

इतक्या मोजक्या शब्दांत इतकी नेटकी वस्तुस्थिती मांडणे ही खरच कमाल आहे! अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अतिशय कमी शब्दांत.. पोकळ पौरूषत्वाची छान मांडणी केली आहेस. वस्तुस्थिती आहे. संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! या ओळी अत्युच्च! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! --- हे तर उत्कॄष्टच ! बस्स्स ! माझे शब्द संपले !! खूप छान , उत्तम....वगैरेच्या पलिकडली कविता. अजून येऊद्यात !!

तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! सुंदरच... :) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...

कविता आवडली .. वास्तवाचे नेमके वर्णन आहे ... तुझे सात जन्म माझे मान उपकार माझे! परत आठव्या जन्मी गुलाम! होईल कोणी माझे!! ............ हे खासच !

In reply to by धनंजय

धनंजय शी सहमत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

उको.... मिपावर स्वागत ! छान :-) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)