आता नको
लेखनविषय:
भावनांचे पसारे खुप झाले
हे असे वेडावणे आता नको ... !
वळणावर त्या रेंगाळलेल्या
आठवांची साथ आता नको ... !
हृदयात तू कोंडलेल्या सखे
सुखांचा गुदमर आता नको ... !
चल सखे स्वप्न स्वप्न खेळु
वास्तवाचा धाक आता नको ... !
हरवले स्वर ते सारे आता
हुरहुर मारव्याची आता नको ... !
त्या तिथे पलिकडे .., ते चित्र
फसव्या सुखाचे आता नको ... !
चल सखे पैलतीरी जावू
मोह ऐलतीराचा आता नको ... !
विशाल
वाचने
1371
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
चल सखे