Skip to main content

आता नको

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 28/03/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांचे पसारे खुप झाले हे असे वेडावणे आता नको ... ! वळणावर त्या रेंगाळलेल्या आठवांची साथ आता नको ... ! हृदयात तू कोंडलेल्या सखे सुखांचा गुदमर आता नको ... ! चल सखे स्वप्न स्वप्न खेळु वास्तवाचा धाक आता नको ... ! हरवले स्वर ते सारे आता हुरहुर मारव्याची आता नको ... ! त्या तिथे पलिकडे .., ते चित्र फसव्या सुखाचे आता नको ... ! चल सखे पैलतीरी जावू मोह ऐलतीराचा आता नको ... ! विशाल
लेखनविषय:

वाचने 1374
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चल सखे पैलतीरी जावू मोह ऐलतीराचा आता नको ... अहाहा ! घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

चल सखे स्वप्न स्वप्न खेळु वास्तवाचा धाक आता नको ... ! सुरेख! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/