Skip to main content

किमया

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 15/03/2009 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
सांग ही किमया कशाची? मी नवी, जग हे नवे सांगती माझी कहाणी पाखरांचे हे थवे पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी सप्तरंगी इंद्रधनूचे रंगगहिरे ताटवे? शोधले मी आज माझे हरवलेले सूरही आणि वा-याने सुरांना बांधले नूपूरही गीत माझे मोरपंखी भावनांना जागवे मीच गाणे कोकिळेचे चातकाची मी तृषा मीच कातर सांज हळवी मी उषा अन मी निशा ज्योत माझ्या अन्तरीची वाट मजला दाखवे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1675
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मस्त ! मीच गाणे कोकिळेचे चातकाची मी तृषा मीच कातर सांज हळवी मी उषा अन मी निशा ज्योत माझ्या अन्तरीची वाट मजला दाखवे ......... सुंदर !!! --- कविता आवडली .

अतिशय आशादायी कविता. खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी............. अहा क्या बात है !!

आवडली कविता. छान आहे.