Skip to main content

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 03/03/2009 14:30 या दिवशी प्रकाशित केले.

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |
अंतरीचा ठेवा | पाहसी ना ||
जगी या मांडल्या | सुखाचिया पेठा |
सुख घेता ओठा | नष्ट शून्य ||
दया करोनिया | संते दिले गुज |
रामनाम बीज | उच्चारी तू ||
नामे उद्धरिल्या | पापियांच्या व्यथा |
तुझी काय कथा | सांगसी तू ||
सागर लहरी | अनंत उठती |
शमवुनी चित्ती| शांत व्हावे ||
- सागरलहरी

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1750
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वाहवा .... फारच मस्त.. सागरलहरीचे कडवे तर मस्तच !
जय जय रघुवीर समर्थ !!
-- लिखाळ.


अतिशय सुंदर लिहिलेत! प्रचिती असेल अशीच तर क्या बात है!! :)
येऊ देत अजून.. लिखाळरावांशी सहमत.
मुमुक्षु