Skip to main content

करार

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 02/03/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
करार माझे कधी तुझ्याशी काही करार होते तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली काळोख पान्गताना उघडेच दार होते हातून सावलीचा निसटून हात गेला, आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते
लेखनविषय:

वाचने 1977
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सगळेच शेर खास. श्वास उधार, उघडे दार, सावलीचा हात... उत्तम. :) अभिनंदन!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

तुझी कविता मला फार आवडली..! त्यातंलं "श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते - हे तर मला फार भावलं.

In reply to by मयूरी

:S धन्यवाद मयूरी. क्रान्ति