Skip to main content

करार

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 02/03/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
करार माझे कधी तुझ्याशी काही करार होते तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली काळोख पान्गताना उघडेच दार होते हातून सावलीचा निसटून हात गेला, आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते
लेखनविषय:

वाचने 1982
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वा !! मस्तच ... वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते .......सुंदर ! खूप छान कविता ....

तुझी कविता मला फार आवडली..! त्यातंलं "श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते - हे तर मला फार भावलं.