Skip to main content

खूण

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 28/02/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.

जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला,
कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १

काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी,
श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २

रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला,
जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३

स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते,
क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४

श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते
कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५

- सौरभ वैशंपायन.

लेखनविषय:

वाचने 1753
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला,
जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३

अप्रतिम कल्पना.. मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/


श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते
कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५ .... सुंदर

सुरेख कविता !!