Skip to main content

तू

लेखक सचिन यांनी गुरुवार, 29/01/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे येणे अन् ही सर काही संबंध असावा चोहीकडे सप्तरंग पसरले--कधी ? कसे ? तुझी पावले की भाग्य काही संबंध असावा सारे ऋतू माझे सदा असे बहरले कसे ? तुझा स्पर्श वा परीस काही संबंध असावा क्षण अन् कणही माझे उजळले तरी कसे ? तुझे हसणे की फुले काही संबंध असावा घरभर ताटवे हे मग उमलले कसे ? तुझे प्रेम नि सागर काही संबंध असावा या लाटा तो किनारा दोन्ही लाभतात कसे ?
लेखनविषय:

वाचने 1722
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तूझी कविता हि अशी काही संबंध असावा मिपा वर केश्या रंगा विडंबन करिल कसे ?