Skip to main content

ओंजळ (देवद्वार छंद)

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 23/01/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन का उदास ओलावती डोळे खिन्नतेचे जाळे अंतरात... नीरव शांतता सुचेनात गाणी विसावे लेखणी कोरे सारे.. तडफड उरी कळावी का कुणा मनातल्या खूणा पुसटशा... शोधिते स्वतःला गाभ्यात या खोल देवुनीया मोल आसवांचे.. समजेना काही गेले कुठे सारे चैतन्याचे झरे मनातले... वाळवंट रुक्ष रणरण वाटा आयुष्य फुफाटा चोहीकडे.. थके जीव आता दूर मृगजळ रिती ही ओंजळ वाट पाहे...
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4201
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

शोधिते स्वतःला गाभ्यात या खोल देवुनीया मोल आसवांचे.. थके जीव आता दूर मृगजळ रिती ही ओंजळ वाट पाहे... हे विशेष आवडले..! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

खरंच कधी कधी असा काळ असतो की जीवनात काही रसच उरला नाही असे वाटू लागते. छानच मांडलीये तगमग. शुभेच्छा. मुमुक्षु

कविता आवडली. -- लिखाळ.

अतिशय सुरेख कविता. शेवट अतिशय सुंदर आहे कवितेचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शोधिते स्वतःला गाभ्यात या खोल देवुनीया मोल आसवांचे.. व्वा..मस्तच. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.

फार छान कविता

मस्तच आहे कविता

फार छान मस्तच आहे कविता आवडली.

आवडली (आस्वादक)बेसनलाडू

आवडली. विशेषतः शेवट जमून आलाय.

काय सुरेख कविता !! आधीही आपल्या कवितेवरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, नित्य नविन कल्पना मांडण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ओळी अश्या असतात की पुन्हा पुन्हा वाचत रहाव्या वाटतात, गुणगुणाव्या वाटतात !! थके जीव आता दूर मृगजळ रिती ही ओंजळ वाट पाहे... हॅट्स ऑफ्फ !!

जे मी तुला मागे लिहीले होते त्याचेच उत्तर तु ह्या कवितेतुन दिलेस पद्मश्री . नीरव शांतता सुचेनात गाणी विसावे लेखणी कोरे सारे.. तडफड उरी कळावी का कुणा मनातल्या खूणा पुसटशा... हे मला नक्किच जाणवले होते आणि त्याच काळजीने मी तुला टेस्टिमोनिअल पण दिला होता. एकन्दर कविता छान झाली आहे . तुझ्या मनाची तडफड कळु शकते , निदान मला तरी ....