Skip to main content

प्रश्न

लेखक शुभान्गी यांनी शुक्रवार, 23/01/2009 03:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना.... एका गालात मारले तर दुसरा गाल करावा पुढे... मग प्रत्येक जण मारल्याशिवाय जाईल का पुढे ? नेकी कर दरिया मे डाल...... मग एक दिवस स्वत:लाच बुडतान्ना नाही का पहाल? निन्दकाचे घर असावे शेजारी..... जर निन्दकच घुसला घरात,आदरतिथ्य करावे तरी? नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........ करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे? बोट दिले तर हात धरु नये..... पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे? चूक भूल द्यावे-घ्यावे.... वाटले मन मिपावर मोकळे करावे. अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट... अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.
लेखनविषय:

वाचने 1766
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चूक भूल द्यावे-घ्यावे.... वाटले मन मिपावर मोकळे करावे. अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट... अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट. सुंदर कविता. जियो..! तात्या.

खूप भावली!

नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........ करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे? बोट दिले तर हात धरु नये..... पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे? आवडले !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शुभांगी,खूपच छान. थोडे अजून लयीत येऊ दे.

खुपच छान! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.