पुरे जाहले "केश्या" मेल्या सोड अता ही निवृत्ती
तुला न जमणे गप्प बैसणे ही न तुझी रे प्रवृत्ती
तू गेल्यावर 'ब्याद टळाली' कुजबुजले हे जालकवी
तू गेल्यावर आणि निघाल्या तुझ्या किती या आवृत्ती
'कट्टे' झाले, 'हल्ले' झाले, नि झाले 'नेहरू' 'गांधी'
'शिल्पे' झाली, 'चर्चा' झाल्या आणिक जळजळ 'भटकंती'
कौल लावले कुणी फुकाचे, चित्रे संगणकी कोणी
बक्कळ झाली भाषांतरे , अन प्राण्यांच्या पाककृती
परीक्षणे आली शिणमांची, अन पडली व्यक्तिचित्रे
दिसू लागल्या 'अर्ध्या चड्ड्या' अन 'स्वेटर' अवतीभवती
जुनी स्थळे नि नवीन खोड्या, अजीर्ण झाले 'विषया'चे
लैंगिकता अन समोपदेशन, वाचून झाली गुंगमती
येतो आम्ही घडीभर येथे विसरण्या दुःखे अमुची
परंतु येथे सुरू भांडणे, नि गंभीर कविता वरती
किती वाचावे दुःख वेदना ओढून तरी चेहरा
पुरे जाहल्या कविता गंभीर लाव त्यांना तू बत्ती
'सात्त्विक थाळ्या' पुरे आता लावा 'भेळेची गाडी'
बाप बाटली लाथा बुक्क्या अन "केश्या"ची कंबख्ती
घाल पुन्हा धुडगूस जाली लोकांना हसू दे थोडे
आम्हा सांगती 'अतींद्रिये', सोडशील तू निवृत्ती
लाग "केशवा" कामाला तू पुरे जाहली विश्रांती
नमन करुनी सर्व कवींना करू साजरी संक्रांती
केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5778
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो !!!!!
++१
In reply to जियो !!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
++२
In reply to ++१ by कोलबेर
+++३
In reply to ++२ by घाटावरचे भट
++++४
In reply to +++३ by सहज
+++++५
In reply to ++++४ by अवलिया
+६
In reply to +++++५ by ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जी गुर्जी!!
अरे वा !
केशवा, प्रत
स़क्रांती
जोरदार पुनरागमन!!
विसरण्या दुःखे अमुची
=D> =D> =D>
+++++++१
In reply to =D> =D> =D> by प्राजु
गुरुमाऊली, गुरुमाऊली, सदा कृपेची करी सावली ||
+१
In reply to गुरुमाऊली, गुरुमाऊली, सदा कृपेची करी सावली || by पिवळा डांबिस
धन्य जाहलो
धडाक्यात पुनरागमन
धडाक्यात पुनरागमन
संक्रांत!!!
सह्ही
क्या बात है !!
स्वागत आहे !!!
१+
In reply to स्वागत आहे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेलकम बॅक...
वा
मस्त..
धन्यवाद!!