Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 28/09/2026 23:15 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव खायला जमले कावळे 
सोबत होते पाव्हणे रावळे

 

तिखटजाळ होती तर्री
कावळ्यांची उडाली खूप भंबेरी

 

कावळे ओरडले काव काव 
अजून पाहिजे आम्हाला पाव

 

एक कावळा होता हेकट
म्हणाला अजून करा मिसळ तिखट

 

मिसळीने कावळ्यांचे भाजले तोंड
जिभेवर आले मोठे फोड

 

तिखटाने घाबरले कावळे सारे
मिसळीपेक्षा पिंड बरे

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 460
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हा हा हा !!! मस्त लिहिले आहे. 

तरीही या कवितेत कांदा लिंबाचा उल्लेख नसल्याचा जाहीर निषेध! 😜


कांदा लिंबू यांशिवाय मिसळपावला चव नाही!


कावळ्यांनी यावर्षी धमाल उडवली.

 

तशा कावळ्यां सारख्या क्षुद्र (असे काहींचे मत,माझे नाही) विषयावर  कय लिहीता येईल आणी लिहूनही मराठी साहित्यावर काय फरक पडणार......

 

ज्ञानोबा माऊली आणी महादुखाचा कवी ग्रेस यांनी कावळ्याला यथोचित सन्मान दिला आहे आणी आता मिपाकर देत आहेत.

 

काव काव.... उगाच का ओरडता राव

मी जरी काव काव म्हणतो

पण तुला पाहुणे येणार  म्हणून सांगतो....

कशाला हाकलला मला...

तुमची तुम्ही तयारी करा.

मस्तच. 


In reply to by कर्नलतपस्वी

पितृपक्षात कावळे धमाल करतातच. हा त्यांचा हक्काचा पंधरवडा. इतरवेळी ओंकारेश्वराच्या घाटावरच त्यांना ताटकळत बसावं लागतं. 


In reply to by श्रीगुरुजी

नाही हो... गेले ते दिवस.

 

हल्ली घाटावर पोहोचवणा-यांनाच कावळ्यांची वाट पहात बसावे लागते... कावळे सगळे पांगले.

 

शेवटी दर्भाचा कावळा करुन समाधान मानुन घ्यावे लागते... हिंदू धर्म लवचिक आहे म्हणून बरे नाही...

 

(किरवंत) जोशी 


बंधूंनो, जरा विचार करा,
मिसळीपेक्षा पिंड बरा!

पिंडामध्ये असतो भात,
मिसळीचा वेगळाच थाट!

मिसळीचा जरी तोरा न्यारा,
तरी रस्सा भाव खातो सारा!

मिसळ खावी भर दुपारी,
झोंबत्या आठवणी येती सकाळी !

पिंडाचे मात्र तसे नाही,
कावळा खाई, नाहीतर गाय खाई!

दोन्ही वेळी पुण्य मिळते,
पितरांची वाट मोकळी होते!

एकाच दगडात दोन पक्षी,
पिंडावर अबीराची नक्षी!

मिसळीने जिभेला फोड,
पिंडाने पुण्याचा जोड!

म्हणून बंधूंनो, (आणि त्यांच्या मामे बहिणिंनो )

निट विचार करा!

हा निष्कर्ष अगदी खरा—
मिसळीपेक्षा पिंड बरा!

(वयोमानापरत्वे सक्तीचा पिंडप्रेमी) पैजारबुवा, 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

एकदम मजेशीर! मजा आली. 

 

मिसळपाववर कावळ्यांसोबत पिंडालाही बरे दिवस आलेत. 

 

कावळ्यांना कवितेतून प्रसिद्धी दिल्याने माझ्या पिंडाला कावळे तात्काळ शिवतील अशी माझी श्रद्धा आहे. 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गूढ-रम्य, (पिंड-विरहित) प्रसिद्ध कविता:

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https…


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिसळ खावी भर दुपारी,
झोंबत्या आठवणी येती सकाळी !

 

हा .... हा ....हा ! 


प्रतिसाद देणाऱ्या सर्वांच्या पिंडाला, कोणतेही आढेवेढे न घेता आणि ताटकळत न ठेवता, कावळे शिवणार. 😅