वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला काही तीथेच निजला
दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं
विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी
सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर
झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2926
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर... चित्रदर्शी रचना
छान कविता .
थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही.
संत तुकारामा वर आहे हो काव्य
In reply to थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. by चित्रगुप्त
बरोबर. पहिल्या कडव्यातून ते कळले, तरी शेवटली तीन अगम्य
In reply to संत तुकारामा वर आहे हो काव्य by गणेशा
संत तुकारामा वर आहे हो काव्य
In reply to थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. by चित्रगुप्त
संत तुकाराम यांच्यावर असे
In reply to संत तुकारामा वर आहे हो काव्य by गणेशा
@चित्रगुप्त,गणेशा -कविवर्य ग्रेस म्हणतात....
In reply to थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. by चित्रगुप्त
समजली,
In reply to @चित्रगुप्त,गणेशा -कविवर्य ग्रेस म्हणतात.... by कर्नलतपस्वी
कुळं , गुळं,मुळं, लोटं,
@कर्नल साहेब, आता समजले.
Oh! स्पष्टीकरणा नंतर समजली! :
वाचुन समजली असे वाटले होते
In reply to Oh! स्पष्टीकरणा नंतर समजली! : by गणेशा
धन्यवाद
In reply to वाचुन समजली असे वाटले होते by राजेंद्र मेहेंदळे
कविता ही शब्दयात्री, उभी
@गणेशा
In reply to कविता ही शब्दयात्री, उभी by गणेशा