✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पावसाचं वय....

क — कर्नलतपस्वी, Wed, 08/16/2023 - 20:38
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर हातात पुस्तक,मनात हुरहूर "घेतां ना चहा !",बहुतेक कान वाजले सांग ना रे पावसा अजून किती राहिले!

प्रतिक्रिया द्या
8847 वाचन

💬 प्रतिसाद (21)

मजेशीर मस्त गजब कविता.

चित्रगुप्त
गुरुवार, 08/17/2023 - 03:46 नवीन
मजेशीर मस्त कविता. यमकं बिमकं पण छान जुळत आहेत. अवघ्या सहा कडव्यात 'तोंडात अंगठा' पासून 'डोळ्यावर चष्मा' पर्यंतचा 'वर्षा-प्रवास' हळुवार समर्थतेने मांडणे थोरच. फक्त - स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? --- --- या कडव्यात चाराऐवजी पाच ओळी आल्याने जरा विचित्र वाटते आहे. हे बघा कसे वाटते: व्हिस्कीची बाटली, चकण्याची ताटली मित्राची संगत, त्याविना नाय गंमत खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? (या शिवाय आणखी एक) "घेतां ना चहा !" शब्द कानी आले सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!
  • Log in or register to post comments

कविता आवडली!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 08/17/2023 - 11:49 नवीन
शैशव ते वार्धक्य हा प्रवास उत्तम रितीने मांडला आहे. रच्याकने---आजुन कसा आला नाही (मित्र),खड्डय़ात पडला का काय! ही एकच ओळ धरल्यास म्हणताना खटकत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

"अजून किती (पावसाळे) राहिले"... हुरहुर लावणारा शेवट.

चित्रगुप्त
गुरुवार, 08/17/2023 - 04:07 नवीन
डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर हातात पुस्तक,मनात हुरहूर .... अश्या 'संध्याछाये'नंतर - "सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!" असा शेवट कमालीची हुरहुर लावून जातो. कोटि कोटि प्रणाम.
  • Log in or register to post comments

ज्याची जशी असते सय तसं पाऊसाचे असते वय......

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/17/2023 - 07:16 नवीन
कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय. नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हे तर फारच र्‍हदयस्पर्शी आहे (मला सुचले/समजले नव्हते)

चित्रगुप्त
गुरुवार, 08/17/2023 - 07:25 नवीन
कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय.
-- हे तर फारच र्‍हदयस्पर्शी आहे. पूर्ण कविता यामुळे एका वेगळ्याच आयामात पहुचली आहे. अशा अर्थाचा 'कान वाजणे' असा खास वाक्प्रचार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

होय,एक आजार सुद्धा....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/17/2023 - 08:32 नवीन
भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. वैवैद्यकशास्त्रात या त्रासाला इंग्रजीत 'टिनिटस' असे म्हणतात. कानात येणारा आवाज दोन प्रकारचा असतो- सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह आवाज म्हणजे जो केवळ रुग्णाला ऐकू येतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कानातील दुसऱ्या व्यक्तीलाही ऐकू येणारा आवाज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह.
  • Log in or register to post comments

दिवंगत पत्नीशी संभाषण, टिनिटस वगैरे.

चित्रगुप्त
गुरुवार, 08/17/2023 - 14:36 नवीन
भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.
हे वाचून आठवले, की माझ्या एका मित्राची पत्नी निवर्तल्यावर तो एकटाच रहायचा, अणि दिवंगत पत्नीशी बोलत रहायचा. ती त्याला अमूक करावे तमूक करावे सांगायची, त्याप्रमाणे तो करायचा, असे खुद्द त्यानेच सांगितले होते. -- मला स्वतःला एका प्रसंगी असे काही शब्द अगदी स्पष्ट खणखणीत रूपात कानावर पडलेले असल्याचे आठवते. (तो प्रसंग फार वेगळा, एकमेवाद्वितीय असा होता) मात्र 'टिनिटस' हा प्रकार वेगळा असतो. ही व्याधि मला अनेक वर्षांपासून आहे. अगदी आत्ता हे लिहीताना सुद्धा विशिष्ट आवाज कानात गुंजत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुंदर. आयुष्याचा प्रवास

प्रचेतस
गुरुवार, 08/17/2023 - 22:51 नवीन
सुंदर. आयुष्याचा प्रवास नियमित येणाऱ्या पावसाच्या संगतीने सुरेख मांडलाय.
  • Log in or register to post comments

आवडली!

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:14 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

कविता आवडली. प्रत्येक

शेखरमोघे
Fri, 08/18/2023 - 08:09 नवीन
कविता आवडली. प्रत्येक कडव्याचा "सांग ना रे पावसा काय तुझं वय?"ने होणारा शेवट, पण कवितेचा शेवट मात्र "सांग ना रे पावसा अजून किती राहिले!" हे चटका लावणारे वास्तव छानच.
  • Log in or register to post comments

प्रतीसाद...

कर्नलतपस्वी
Fri, 08/18/2023 - 12:20 नवीन
प्रतीसादक आणी वाचकांचे आभार. शेखर भौं नी कायप्पावर हांक(काॅल) मारून कवीता आवडल्याबद्दल सांगीतले. आनंद द्विगुणित झाला. त्यांचे विशेष आभार. क लो आ
  • Log in or register to post comments

आवडली

नि३सोलपुरकर
Fri, 08/18/2023 - 13:13 नवीन
काकानु , कविता आवडली . __/\__
  • Log in or register to post comments

वाह सुंदर कविता

बाजीगर
Fri, 08/18/2023 - 15:45 नवीन
वेगळी आणि आयुष्याचे सर्व टप्पे कव्हर करणारी 'पाऊस-कविता'. यमकं खूप सुंदर घेतली आहेत. खूप आवडली हि कविता कर्नलजी.
  • Log in or register to post comments

मजा आया !

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/20/2023 - 19:36 नवीन
मजा आया !
  • Log in or register to post comments

आभारी....

कर्नलतपस्वी
Sun, 08/20/2023 - 19:44 नवीन
नि३, अतृप्त आत्मा(बादवे सर्वांचाच असतो),बाजीगर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त कविता

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/21/2023 - 10:34 नवीन
एका हातात किरण्याच्या पिशव्या दुसरा हात पकडून रडणारे कारटे तुझ्याच धुंदीत कधीतरी जूळले तिचाशी नाते आठव रे पावसा ते साल कोणते होते? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पैजारबुवा...

कर्नलतपस्वी
Sun, 08/20/2023 - 22:16 नवीन
ज्याची जशी असते सय तसं पावसाचं असते वय...... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खूपच छान

सौन्दर्य
Mon, 08/21/2023 - 08:21 नवीन
कविता आवडली, जीवनाच्या विविध टप्प्यावरचे वर्णन आवडले. असेच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
Mon, 08/21/2023 - 14:46 नवीन
कर्नलसाहेब, कविता आवडल्या गेली आहे. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

मस्त कविता.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 12/26/2023 - 12:59 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments

सर्व वाचकांचे

कर्नलतपस्वी
Tue, 12/26/2023 - 14:07 नवीन
मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा