निसर्ग बरसला
सुखाचा पाऊस,
आनंदाचा कंद
घरी आला.
भक्तीचा उत्सव
आनंदले रोम
गणपतीचा सण
आला आला.
सुखकर्ता आला
विघ्नहर्ता आला,
आयुष्याचा कर्ता
घरी आला.
वर्षभर ज्याची
पाहतो मी वाट,
तो दु:खहर्ता
घरी आला.
फुलला पारिजात
उंचबळे सुवास,
सुगंधाचा दाता
घरी आला.
विद्येचा ईश्वर
ज्ञानाचा दाता
बुद्धीचा विधाता
घरी आला.
--- अभय बापट
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2903
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
धन्यवाद
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणपती बाप्पा मोरया !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Coverबाप्पा
In reply to गणपती बाप्पा मोरया ! by मदनबाण
बाप्पा मोरया !!!
मोरया
In reply to बाप्पा मोरया !!! by सागरसाथी