मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुढार्‍यांचे देशभक्ती गीत

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
या मातेचे कुपुत्र आम्ही आम्हास कसली लाज बटीक बनवली आम्ही तिजला भागविण्या अमुचीच खाज गरीबांच्या या टाळु वरचे आम्ही खातो लोणी नित्य नवी आम्हा लागते रम आणि रमणी कोण कुठले भगतसिंग..? अन कोण कुठले राजगुरु.. आम्ही वंदितो भाई ठाकुर अमर, अरुण, साटम गुरु.. उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!!

वाचने 4389 वाचनखूण प्रतिक्रिया 5

रामदास 07/12/2008 - 09:41
कृपया पहीली ओळ संपादीत करा.

श्रीकान्त पाटिल 14/12/2008 - 10:44
उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!! एकदम हूबेहूब वर्णन आहे सद्य स्थितिचे ... वा काय मस्ती आहे अन्गातली पाठीत घातली पाहीजे ह्यान्च्या लाठी

विसोबा खेचर 14/12/2008 - 12:02
सुंदर कविता... पहिल्या कडव्यात मला तरी काही वावगे दिसले नाही. हल्लीची बहुतांशी राजकारणी मंडळी त्याच लायकीची आहेत.. गोखलेसाहेब, पार्श्वभागाच्या लाल रंगामुळे कविता वाचायला अतिशय त्रास झाला. तात्या.

शशिधर केळकर 17/12/2008 - 00:42
छान कविता. थोड्याशाच ओळी, पण किती प्रभावी पणे मनातले विचार व्यक्त करू शकतात याचे छान उदाहरण. मजा आली. बाकी 'गोखलेसाहेब, पार्श्वभागाच्या लाल रंगामुळे कविता वाचायला अतिशय त्रास झाला' इति तात्या. सहमत.