Skip to main content

सारे प्रवासी घडीचे

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 16/01/2022 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
या चंद्रमौळीत माझ्या लक्ष सुखे ऱममाण असते कधी सुखाला सांगा कुठे परिमाण जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या तिरीप कोवळ्या उन्हाची भासे जणू ही रेघ सोनसाखळी गळ्याची वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो घुसतो धटिंगण वारा सवे आणतो थेंब पावसाचे उध्वस्त करू पहातो साम्राज्य माझिया सुखाचे कोणी गरीब म्हणूनी हसती मजवर सारे इथे काय आहे म्हणूनी आकलेचे तोडती तारे सारे प्रवासी घडीचे सांगा कोण कुठे काय नेते समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे या चंद्रमौळीत माझ्या ...... १६-१-२०२२
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5931
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खूप छान.
समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे
खरं आहे!
सारे प्रवासी घडीचे
_/\_

प्रतीसादा बद्दल धन्यवाद भक्ती, श्रीगणेशा

मस्त... फारच आवडली पैजारबुवा,

In reply to by मुक्त विहारि

नीड़ न दो, चाहे टहनी का आश्रय छिन्‍न-भिन्‍न कर डालो, लेकिन पंख दिए हैं, तो आकुल उड़ान में विघ्‍न न डालो। नुकताच हँप्पी बड्डे झाला, मुलीने सटर फटर गोष्टिंबरोबर दोन कवीता संग्रह पण दिले. पैकी एक वरील कवीता वाचताना सहज वाटले की वरिष्ठ नागरीकांची सुद्धा कदाचित हिच आपेक्षा की आम्हाला आमचं जगू द्या. विचार करत असताना वरील ओळी सुचल्या. प्रतिसादा करता धन्यवाद. तुम्ही तर मुक्त विहारी .....

डेबूजी झिंगराजी जानोरकरांचे सहधर्मी निघालात! दृष्टिकोन आवडला!

In reply to by अनन्त्_यात्री

कविता वाचताना मला तर माणिकदेव बंडुजी इंगळे यांची आठवण आली पैजारबुवा,

धन्यवाद अनंत यात्री. धाग्यावर मग तो कुणीही लिहीलेला असू द्या तो वाचताना कधी कधी। semaphore flag code आणि International Morse Code सारखा वाटतो. डिसायफर करता येत नाही. धन्यवाद माऊली.

या झोपडीत माझ्या, आमच्या पिताश्रींना अभ्यासक्रमात असलेली कविता, आजही तोंडपाठ आहे त्यांना. तीच आठवली