मेरा कुछ सामान... भावानुवाद.
तुझ्यापाशी ठेवलेले
काही जपून अजून.
चिंब चिंब भिजलेले
श्रावणाचे काही दिन..
एक रात्र थांबलेली
पत्र माझे पांघरून,
रात्रीला त्या विझवून
दे ना सारे पाठवून..
ऐकतोस ना रे तूही
पाचोळा हा वाळलेला?
नाद त्याचा एकदाच
कानांमध्ये माळलेला..
शिशिराची एक फांदी
हलताहे रे अजून,
तीच डहाळी मोडून
दे ना सारे पाठवून..
छत्री एकुलती एक,
दोघे अधमुरे ओले
कोरडे वा चिंब थोडे.
सुके तर माझ्यासवे;
उशापाशी भिजलेले
राहिले का माझे मन?
आवरून सावरून
दे ना सारे पाठवून..
अगणित चंद्रवेळा..
एक तीळ खांद्यावरी..
मेंदीओला दरवळ..
रुसवे ते कितीतरी,
आणि अनेक वचनं
खरीखोटी भासणारी..
बघ तूही आठवून
दे ना सारे पाठवून..
पाठवशी जे तू सारे
मृण्मयी ते करण्याची,
दे ना मला अनुमती
डोळे तिथे मिटण्याची..
याद्या
16174
प्रतिक्रिया
34
काव्यरस
मिसळपाव
सुंदर
अतिशय तरल सुंदर गाणं आहे ते.
In reply to सुंदर by Bhakti
अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी..
धन्यवाद.
In reply to अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. by नीळा
अरेरे ताई...
In reply to धन्यवाद. by प्राची अश्विनी
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!!
In reply to अरेरे ताई... by चांदणे संदीप
राजेंद्रजी धन्यवाद!:)
In reply to धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
एकशे सोळा चांदण्या रात्री
In reply to अरेरे ताई... by चांदणे संदीप
असो. :)
In reply to अरेरे ताई... by चांदणे संदीप
नसो हो. शोधा . आहे असे
In reply to असो. :) by प्राची अश्विनी
गवि, असो हा प्रतिसाद संदीप
In reply to नसो हो. शोधा . आहे असे by गवि
रोचक!
In reply to अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. by नीळा
हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा
In reply to रोचक! by पुष्कर
वाचलो...
In reply to हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा by रुपी
हा व्हिडीओ का?
In reply to हो.. हाच अर्थ आहे त्या ओळींचा by रुपी
एक सौ सोलह
In reply to हा व्हिडीओ का? by प्राची अश्विनी
सुंदर
वाह
सुंदर गाण्याचा सुंदर अनुवाद.
वाहा क्या बात है !
अप्रतिम!
-_/\_
In reply to अप्रतिम! by पुष्कर
प्रतिमा उत्कट
अतिशय सुंदर!
:) धन्यवाद.
In reply to अतिशय सुंदर! by तुषार काळभोर
छान...
अतिशय सुंदर भावानुवाद !
सुंदर
धन्यवाद सर्वांना.
खूपच छान
व्वा, कया बात है !
क्लासिक !
💖
धन्यवाद!
हे
:)
In reply to हे by मिसळलेला काव्यप्रेमी