✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

॥ कृष्णतृष्णा ॥

म — मी-दिपाली, Sat, 08/15/2020 - 22:44
इंद्रलोकीचे दिव्य फूल ते द्याल मजला का श्रीहरी। हट्ट पुरवण्या भामेचा मग लावला पारिजात दारी ॥ क्षणिक ठरले सुख भामेचे हरिस प्रिय मी रुक्मिणीहुनी। गेले ते अवसान गळोनी सडा पाहता तिच्या अंगणी ॥ प्रासादी ना रमली मीरा प्रभूभजनी दंग जाहली। मनी वरोनी गिरीधारिसी विषप्यालाही सुखे प्याली॥ लावण्यासवे पाहुनी कृष्णा कुब्जा लपवी शापित याैवन। हरखुनी गेली उमगे जेव्हा शाम होता तिजसाठी पण॥ रंगुनीया रंगात साऱ्या एक झाला रंग अवघा । राधा होई का निळी हे अजुनी न कळे श्रीरंगा॥ कदंबतळी रासलीलेचे विलोभनीय दृश्य दिसे। हरेक गोपिकेच्या संगे कृष्ण दिसे...कृष्ण दिसे॥

प्रतिक्रिया द्या
4796 वाचन

💬 प्रतिसाद (11)

सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 08/16/2020 - 16:43 नवीन
सुंदर रचना प्रस्तावनाही आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मी-दिपाली
Mon, 08/17/2020 - 15:37 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

छान

गणेशा
Sun, 08/16/2020 - 17:00 नवीन
छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मी-दिपाली
Mon, 08/17/2020 - 15:37 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान कविता

तुषार काळभोर
Sun, 08/16/2020 - 19:47 नवीन
कविता, शेवटचा प्रकटन व्हिडिओ आणि विशेषतः कवितेचं नाव - कृष्ण तृष्णा - आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मी-दिपाली
Mon, 08/17/2020 - 15:37 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अहाहा.. किती सुंदर निरुपणासह

Bhakti
Mon, 08/17/2020 - 11:53 नवीन
अहाहा.. किती सुंदर निरुपणासह सादरीकरण आवडले.तुमची 'पंखा' झाले मी. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद भक्ती. :)

मी-दिपाली
Mon, 08/17/2020 - 15:36 नवीन
धन्यवाद भक्ती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मस्त कविता. खूssप आवडली..

Jayagandha Bha…
Fri, 10/30/2020 - 15:26 नवीन
मस्त कविता. खूssप आवडली..
  • Log in or register to post comments

सुरेख रचना!

प्राची अश्विनी
Fri, 10/30/2020 - 20:18 नवीन
सुरेख रचना!
  • Log in or register to post comments

सुंदर काव्य रचना सुरेख काव्य

माहितगार
Sat, 10/31/2020 - 19:13 नवीन
सुंदर काव्य रचना सुरेख काव्य वाचन. मिपावर आणि इतरत्रही स्त्री कवियत्रींच्या कृष्ण विषयक दर्जेदार काव्य वाचनात येते त्यातील काही कवितांचे तरी एकत्रित रसग्रहण वाचनाचा योग यावा अशी इच्छा आणि आशा या निमीत्ताने नोंदवावीशी वाटते .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा