मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंताक्षरी

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अंताक्षरी 1 सिग्नल ला भिक मागण्या-या 5 वारक-याला मी म्हणालो, 8 तुकोबा म्हणतात, 10 "भिक्षापात्र अवलंबीणे, 12 जळो जिणे लाजिरवाणे" 15 वारक-याने काठी उंचावली, 18 "नाठाळाच्या माथी, 20 हाणू काठी" 22   मी :ठेविले अनंते तैसेची रहावे 27      चित्ती असो द्यावे समाधान 31   वारकारी : नरा ऐशा मोजोनी 35               माराव्या पैजारा  37   मी : रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग 42   वारकारी : गरुड वाहन कासे पीतांबर , 47   काय महिमा वर्णूं त्याची 51   मी : चंदनाचे हात पाय ही 56 चंदन,  परिसा नाहीं हीन 60 कोणी अंग . 62 वारकारी : गांजियेलों 64 तुझ्याघरीं, मागायास गेलों 67 शिदोरी , तुजविणें ते नेदी कोणा 72 सांगतां खुणा जिवें गेलों  76 मी : लोका सांगे तत्वज्ञान 80 आपण कोरडा पाषाण 83 बायको: (वैतागून) 85            लांबला अंताक्षरी खेळ 88             फार गेला इथे वेळ 92             झाला तो ग्रीन सिग्नल 96             आवली म्हणे लवकर चल 100

वाचने 1567 वाचनखूण प्रतिक्रिया 2