Skip to main content
लेखक बाजीगर यांनी सोमवार, 27/04/2020 23:00 या दिवशी प्रकाशित केले.

अंताक्षरी 1

सिग्नल ला भिक मागण्या-या 5
वारक-याला मी म्हणालो, 8

तुकोबा म्हणतात, 10

"भिक्षापात्र अवलंबीणे, 12
जळो जिणे लाजिरवाणे" 15

वारक-याने काठी उंचावली, 18

"नाठाळाच्या माथी, 20
हाणू काठी" 22
 
मी :ठेविले अनंते तैसेची रहावे 27
     चित्ती असो द्यावे समाधान 31
 
वारकारी : नरा ऐशा मोजोनी 35
              माराव्या पैजारा  37
 
मी : रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग 42
 
वारकारी : गरुड वाहन कासे पीतांबर , 47
  काय महिमा वर्णूं त्याची 51
 
मी : चंदनाचे हात पाय ही 56
चंदन,  परिसा नाहीं हीन 60
कोणी अंग . 62

वारकारी : गांजियेलों 64
तुझ्याघरीं, मागायास गेलों 67
शिदोरी , तुजविणें ते नेदी कोणा 72
सांगतां खुणा जिवें गेलों  76

मी : लोका सांगे तत्वज्ञान 80
आपण कोरडा पाषाण 83

बायको: (वैतागून) 85
           लांबला अंताक्षरी खेळ 88
            फार गेला इथे वेळ 92
            झाला तो ग्रीन सिग्नल 96
            आवली म्हणे लवकर चल 100

लेखनविषय:

वाचने 1583
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया