मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिली रात (देवद्वार)

रामजी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
शुभ्र चांदण्यांची । शाल पाघरली । रात ही पहिली । आली सखे ॥ धुंद त्या क्षणांची । पाहतो मी वाट । झेलुया गं लाट । आवेगाची ॥ मनीचा मोगरा । आज बहरेल । श्वास हा भेटेल । श्वासाला गं ॥ रात ही सरेल । देह दुरावेल । मन रेंगाळेल । तुझ्यापाशी ॥

वाचने 2578 वाचनखूण प्रतिक्रिया 4

आजानुकर्ण Sun, 11/16/2008 - 22:08
दार ते लावून कडीही घातली रात्र ही मातली बघ सखे सुगंधी फुलांनी शेज ती सजली जराशी लाजली नवरीही मेजावरी होता दुधाचा गिलास पूर्ण तो पिलास घटाघटा तुझा तो घागरा आज उतरला । श्वास हा भेटला । श्वासाला गं ॥ दोघेही जाहले प्रणयात दंग उधळीत रंग भसाभसा रात्र ना सरावी देह ना दुरावा गोंधळ करावा दररोज धुंद त्या क्षणांनी लावली ती वाट (मोडली ती खाट लोखंंडाची) आपला, (राक्षसद्वार) आजानुकर्ण

प्राजु Sun, 11/16/2008 - 21:49
कविता अतिशय सुरेख झाली आहे. अजानुकर्ण, तुमचीही कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आजानुकर्ण Sun, 11/16/2008 - 22:10
अभिप्रायासाठी धन्यवाद. आपला (आभारी) आजानुकर्ण वरील कवितेत काही बदल करून आम्हीही काव्यकट्ट्याच्या आखाड्यात उतरलो आहोत. आपला, (पैलवान) आजानुकर्ण