Skip to main content

समुद्र...

लेखक veebee009 यांनी शुक्रवार, 14/11/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र... कधी शांत, कधी रागीट... कधी अस्ताव्यस्त, कधी नीट.. कधी धीरोदत्त, कधी उतावळा.. कधी निळा, कधी सावळा.. कधी उद्धट, कधी प्रेमळ.. कधी गहिरा, कधी नितळ.. कधी आनंदी, कधी रुसवा.. कधी सरळ, कधी फसवा.. कधी राजा, कधी वैरागी.. कधी भाग्यवंत, कधी अभागी.. कधी साधक, कधी बाधक.. कधी ओंगळ, कधी मादक.. कधी शहाणा, कधी वेडा.. कधी संपूर्णच, कधी थोडा.. ----------- विनायक बेलोसे-----------
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1920
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हि लिहुन झल्यावर मला.. खरोखरिच आनन्द झाला होता... मला मराथितले इतके निराले शब्द एकत्र एका कवितेत वापरता येतील असे कधी च वाट्ले नव्हते ना म्हनुन..

चांगला प्रयत्न

हे वाचून मला माझी हि कविता आठवली.