शोधत होतो पुन्हा स्वत:ला
उपसत होतो पुन्हा पुन्हा मी
पुरातनाची प्रचंड पडझड
परंपरांची अपार अडगळ
शोधत होतो अथक स्वत:ला
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
वर्तमान हतबल करणाऱ्या
भवितव्याचे भीषण पडघम
ऐकत होतो अधीरपणाने
माझीच अनोळखीशी चाहूल
कळून चुकला पुन्हा, स्वतःचा
शोध विफल ठरण्याचा संभव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1552
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि रचना काही पटली नाही , अशीच
कविता वाचल्यावर खिलजी काकां सारखाच मी सुध्दा थोडा संभ्रमात पडलो