अश्रू
पाणावलेल्या डोळ्यांमधुनी
काय निखळले अश्रू होऊनी
सुरुवात जाहली सांडायला
काय भावना होत्या त्या,
त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी
रूळली अधरांवरती काही,
काही ओघळली गाली
काय मोल त्या आसवांना ,
ते तर फक्त खारट पाणी
असो विरह कि सुखाची मिठी
एकसारखे थेंब मग
ओळखावी कशी चव
वेगवेगळ्या भावनांची कोणी.....
- प्रणया
उत्तम
असो विरह कि सुखाची मिठी
धन्यवाद