पालखी
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८
'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्या किती ओळखी
डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी?
आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)
आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी?
'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी!
दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी!
माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी?
आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी
तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी
वाचने
3723
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
आयुष्या,
एकदम सुरेख..
अवांतर -
In reply to अवांतर - by विसोबा खेचर
मिपावर प्रथम प्रकाशन करावयाचे साहित्य
In reply to मिपावर प्रथम प्रकाशन करावयाचे साहित्य by बेसनलाडू
केवळ
In reply to केवळ by विसोबा खेचर
चाललेच आहे
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
पालखी
कविता
In reply to कविता by मुक्तसुनीत
गझलच आहे
पालखी
काय सुरेख
पालखी - सुंदर गझल