मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावरी...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हळुवार सोडवावं एकेका आठवणीचं पान.. कुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता... निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... खरंच असं करून बघ. खरंच.. मग पुन्हा एकदा अनुभवशील सावरीचं हल्लक मोकळेपण... अगदी मन भरून...

वाचने 1912 वाचनखूण प्रतिक्रिया 5

श्वेता२४ 11/09/2018 - 12:36
निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... अगदी तरल.....