ही हाक कुणाची आहे...!
ही हाक कुणाची आहे...!
उमटती शब्द कागदावर
की तरंग खोल पाण्यावर,
अर्थ लावला त्यांना जरी
तरी,
हा डोह कुणाचा आहे?
बरसत्या धारांना पाहून
बरंच काही येतं दाटून,
थेंबांना समुद्र मिळतो जरी
तरी,
हा घन कुणाचा आहे?
साधेसुधे हे आयुष्यही
सोपे नाही जगणेही,
स्पंदते हृदय माझेच जरी
तरी ,
हा श्वास कुणाचा आहे?
मागे राहिल्या पाऊलवाटा
आता प्रवास एकटीचा
नाही कोणी सोबती जरी
तरी,
ही हाक कुणाची आहे?
फिकीर नाही मला जगाची
विरक्त माझ्या भावना
देहाला मोक्ष मिळेल जरी
तरी ,
हा आत्मा कुणाचा आहे?
-------फिझा.
सुंदर कविता , फार आवडली
खूप सुंदर !
"भर उन्हात तो मला छेडून गेला
मस्त कविता
देहाला मोक्ष ? हे काय आहे बॉ
ती हाक नक्कीच 'त्या' स्त्रीची आहे
=))
रागांनी
अतिशय सुंदर