एकाकी भटकतोय
या अनोळखी दुनियेत
सोबतीला नाही कुणी
या एकेरी वाटेत...
दिसत होतं लांबच लांब आकाश
दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण
दिसत होतं एकच झाड
त्याची होती आकाशाकडे मान
माझ्यासारखीच द्विधा त्याची
ही खंत होती मनात
माझ्यासारखं असू नये कोणी
हीच प्रार्थना करतो सद्गुरू चरणात
रेटता रेटता...
दिसलं एक विसाव्याचं ठिकाण
जाऊन पाहतो तर काय?
माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान
तेथून जावं की थांबावं
हाच होता प्रश्न मनात
कुणी मिळेल जीवाभावाचं
या अनोळखी जगात....
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1648
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
द्विधा मनाची
धन्यवाद....
In reply to द्विधा मनाची by चन्द्रशेखर गोखले
मुक्तक आवडलं!
धन्यवाद....
In reply to मुक्तक आवडलं! by प्रमोद देव