दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो
जीव माझा आरशावर भाळलेला यारहो
बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी
संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो
पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे?
कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो
कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो
प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो
एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ
बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो !
हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले
मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
© विशाल वि. कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11049
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
व्वाह,पढते पढते कव्वाली लगने
व्वा व्वा , आवडली
जबरदस्त!! बहोत खूब!!
धन्यवाद मंडळी !
अप्रतिम...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublicधन्यवाद मंडळी .
एकट्याने झुंजताना कैफ चढतो
विकुशेठ, मस्त ग़ज़ल.
In reply to एकट्याने झुंजताना कैफ चढतो by मिसळलेला काव्यप्रेमी
नाही. वेटेज बदलल्यास मूळ
In reply to विकुशेठ, मस्त ग़ज़ल. by गवि
मीटर म्हणजे काय? ते कसे
In reply to नाही. वेटेज बदलल्यास मूळ by गवि
.
In reply to मीटर म्हणजे काय? ते कसे by प्रचेतस
:(
In reply to . by गवि
जाहीर माफी मागत आहे.
In reply to :( by प्रचेतस
मीटर म्हणजे काय?
In reply to मीटर म्हणजे काय? ते कसे by प्रचेतस
धन्यवाद गवि !
In reply to विकुशेठ, मस्त ग़ज़ल. by गवि
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो गालगागा गालगागा गालगागा गालगायात अजुन एक मी जोडायचा म्हणजे 'गालगागा गालगागागा गालगागा गालगा' असे होइल, त्यामुळे वृत्तभंग होतो, लयही चुकते कारण मात्रा चुकताहेत. हवे तर असे करता येइल.. एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा स्वतः मी कापलेला यारहो मनःपूर्वक आभार !+१११
सुरेख गजल
धन्यवाद नाखुशेठ आणि पिडांकाका