Skip to main content

आठवण

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 08/03/2018 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरसरत्या सरिनी तुझी आठवण यावी रिमझिम पावसात माझ्या सवे तू भिजावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी कधी उगवतो दिस तोहि मावळू पाहतो तुला कुशीत ग घेण्या जिव कासाविस होतो झालो मायेला पारखा तुझ्या माझ्या विरहाने दोन शब्दाच्या प्रेमाला आत्ता किती ग बहाने कधी डोळे मिटताहि स्वप्ने तुझीच का यावी किलबीलती पहांट तुझ्या सवेच दिसावी आता ओढ़ या मनाची कशी कुणाला कळावी राती चांदण्या साथीने माझ्या अंगनी तू यावी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1258
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

दोन शब्दाच्या प्रेमाला आत्ता किती ग बहाने वाह्ह क्या बात है..