अंगांगाची झाली लाही...
सैल नसू दे मिठी जराही!
मेघामाजी उनाड तडिता
तू सागर मी अवखळ सरिता
मला वाहू दे तुझ्या प्रवाही...
सैल नसू दे मिठी जराही!
पदरामधुनी लबाड वारा
घिरट्या घालत फिरे भरारा
गंध तनुचा दिशांत दाही...
सैल नसू दे मिठी जराही!
माझ्याशी तर वाद घालते
मला नाही,ते तुला सांगते
पायामधली पैंजण काही...
सैल नसू दे मिठी जराही!
रोम-रोम रोमांचित होवू
स्पर्शच केवळ स्पर्शच लेवू
अधरा दे अधरांची ग्वाही...
सैल नसू दे मिठी जराही!
चंद्रसरींनी चिंब भिजू दे
तुझे चांदणे मनी रूजू दे
धरेस दुसरे नकोच काही...
सैल नसू दे मिठी जराही!
—सत्यजित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5800
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है..! जबरदस्त
क्या बात है..!
जबरदस्त
अप्रतिम!
अप्रतिम!
वाहवा!
वाहवा!
एकदम मस्त !!!
एकदम मस्त !!!
जामच गोंधळ आहे, मिठी सैल असावी का नसावी कळेना झालाय :P दोन्ही मिठ्या छानच वाटतायत ;)
मस्तच !!! अफलातून !!!
मस्तच !!! अफलातून !!!
मस्तं !
मस्तं !
सुन्दर!
सुन्दर!
धन्यवाद!
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
काय सुरेख जुगलबंदी !
काय सुरेख जुगलबंदी !
प्रितीसाद
ये. एक मिठीसी कविता है!!!
दै मिपा समाचार
वाचनीय रोमांचकारी जुगलबंदी
दै मिपासत्ता
सुंदर लिहिलेयस रे भावा! :-)
सुंदर लिहिलेयस रे भावा! :-)
धन्यवाद!
स्नेहांकिता,नाखु,राघव मनःपूर्वक धन्यवाद!
वाह भाई वा
वाह भाई वा