अंधार काठ
लेखनविषय:
काव्यरस
अंधारा काठी उगवल्या राती
आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
गडद रंगांनी नभ गुरफटते
सावल्यांच्या रानात रेशमी चांदणं उतरते
पानांच्या गर्दीत ओला कवडसा पाझरतो
झाडांच्या कंठात वारा शीळ घालतो
पावला पावलांत मुकी रानवाट मिटते
काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते
वाचने
2182
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुंदर काव्य!
खालील पंक्ती विशेष आवडल्या.
अंधारा काठी उगवल्या राती आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
धन्यवाद
तुमचं नाव ही एक कविता आहे राव. 'चांदणशेला'...काय मस्त शब्द आहे.
In reply to तुमचं नाव by चाणक्य
नाव 'हीच' एक कविता...असे वाचावे.
मनापासून धन्यवाद
लहान मुलांच्या शाळेबाबत खरं असं वाटतं
"पावला पावलांत मुकी रानवाट मिटते
काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते"
अप्रतिम कविता
कविता चुकार नाखु
धन्यवाद
सुंदर काव्य!