Skip to main content

ते...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 27/11/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ते हायेत आपलेचं असं समजुनं वागलो केला इस्वासं म्हनून असे भिकीले लागलो फोळं ये लोक हाताले असं दयन दयलं पिठं भरुन नेतानी आमी त्याईले पायलं ताट आमच्या नावाचं सफा त्याईनच केलं खाली सांडलं खर्कटं तेई सावळूनं नेलं तेल घालून डोयात केलं पीकाच राखन देठा लांबोला त्याईनं ठुली आमाले आकन शिसी बसले ते आता जीव काताऊनं गेला हेला पखाली चा शेवटी पानी वाहू वाहू मेला
लेखनविषय:

वाचने 3206
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

कविता आवडली. ठुली म्हणजे ओरडा का? पीक त्यांनी कापून नेलं, ओरडा आम्हाला ऐकावा लागला अशा अर्थी?

In reply to by सतिश गावडे

बहुधा ठुली म्हणजे ठेवली. आकन म्हणजे काय ते कळले नाही. कविता भावली.

ज्वारी ची कणसे खुडून आणल्या नंतर, शेण,पाण्याने लेपून तयार केलेल्या गोलाकार खळ्यात टाकतात. त्यानंतर त्यावर बैलांना फिरवून त्या कणसांतील दाणे बाहेर पडले की ती कणसे बाजूला काढली जातात.(यांनाही काही प्रमाणात दाणे लगडलेले असतात ) व उरलेले कुटार मिस्रीत ज्वारी उफनून जी ज्वारी ची रास तयार होते ते म्हणजे "देठा" माल (सुपर ग्रेड ) यानंतर बाजूला काढलेली कणसे पुन्हा खळ्यात टाकून त्यावर बैल फिरवून उरले सुरले दाणे काढून वरील प्रमाणे तयार झालेल्या ज्वारी ला "आकन" (फेअर ग्रेड ) म्हणतात .

कविता छान आहे, कमी शब्दांत सर्व काही सांगून जाते. 'शिसी बसले'चा अर्थ सांगू शकाल का ?

भेदक कविता अशा एका अर्थवाही कवितेसाठी वाट पाहत होतो इतरेजन दहा रतीब कविता टाकून या विभागात फिरकु नये अशीच तजवीज करून ठेवली आहे

भेदक कविता अशा एका अर्थवाही कवितेसाठी वाट पाहत होतो इतरेजन दहा रतीब कविता टाकून या विभागात फिरकु नये अशीच तजवीज करून ठेवली आहे