माझा वस्तरा हरवला आहे म्हणून
उगाच रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
तसंही चंद्राला भिंगातून पाहताना
मला ओतावे लागते घागरभर पाणी
मग छाटलेली काठी घेऊन
हाकारावी लागतात गाढवं मैलोनमैल
बघून घेईन मी एकेकाला
ज्यांनी पळवले आहेत माझे रद्दीचे पेपर
पेन्सिलीला टोक करून
माझी शेवींग क्रीम पळवली आहे ज्यांनी
कॅलेंडरवर लिहिलीय मी त्यांची तारीख
आता चाललोच आहे तर
जरा फाट्यावर जाऊन येतो
बाकी वस्तरा हरवला आहे म्हणून
रडण्याभेकण्याचे नाटक कुणी करू नये
-रानातला वेडा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4679
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर झाल राव तुमचा वस्तरा हरवला...
बर झाल राव तुमचा वस्तरा हरवला,
चंद्राच्या पृष्ठ्भागावर ससा जाउन बसला,
ट्रंप तात्यांना टोचली पराणी
ढोनुल्याने गायली गोडगोड गाणी,
पैजारबुवा,
=)) =))
=)) =))
बरं झालं, हरवला आहे तुमचा वस्तरा ।
नाहीतर झाली असती बिनपाण्याने खराखरा ॥
बरं झालं, हरवला आहे तुमचा
In reply to =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
अन घरची अस्तुरी ठसक्यात म्हणली असती,
टराटरा आन फराफरा
काय म्हणावं याला?
काय म्हणावं याला?
काय हे ?
हेच का नवलेखकुंना प्रोत्सा हाण ??
=))
छान कविता केली आहे. मला हि
छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita
आवरा
In reply to छान कविता केली आहे. मला हि by तृप्ति २३
अरे कुणीतरी आवरा यांना!
Sandy
:)
:)
=)
=)
वस्तर्या शिवाय
इतकी चंपी चकोट,तर सापडला तर काय?
अखिल मिपा हंगामी (पावसाळी ) काव्य साथ नियंत्रण संघ,व वाचक वाचले तरच वाचाल समिती संयुक्त प्रकल्प
वस्तरा हरवला आहे म्हणून
अरेरे ! मला भादरायची होती उद्या !