मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आई

शर्मीला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आई जगात सगळीकडे जिचा निवास देवापुढे जिला आद्य स्थान प्रसिद्ध आहे जी जगाची राणी ती म्हणजे तुमची -माझी आई कधी डोळयातील अश्र होऊन भिजुन जाईल. कधी तलवारीची धार बनून चमकून जाईल. कधी ढगातून वीज होऊन गरजेल. तर कधी चंदन होऊन झिजेल. पण आपल्या पिल्ल्याच्या सुखासाठी झटेल अशी तुमची-माझी आई.......... तिची माया व्यापणार नाही सागरातील पाणी . तिची सर नाही अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यार्‍या ज्योतीला तिच्या हदयाची उपमा नाही झाडावर उमललेल्या फुलाला ती जवळी नसते तेव्हा मोल वाटत तिच्या नसण्याचं सागरतील अमर्याद लाटांची गणना होईल पण आईचे ऋण ना फेडता येईल. अशी धन्य धन्य ती तुमची -माझी आई............................

वाचने 4528 वाचनखूण प्रतिक्रिया 8

शर्मीला 11/10/2008 - 10:57
आई ही कविता मी लिहिली . खर सांगु आई कविता लिहिण्यामागचे भाव माझे मनापासून आहेत. त्याच्यातला अश्रु हा शब्द चूकला आहे. त्याबद्द्ल माफी असावी. शर्मीला..........................

आई वर कुणीही आणि कितीही वेळा कविता लिहिली तरी ती नेहमीच सुंदर असणारच आपली कविता पण तशीच सुंदर आहे. आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com