Skip to main content

माझ्या कवितेची शाई

माझ्या कवितेची शाई

Published on 16/03/2017 - 11:39 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या कवितेची शाई आहे अजब मिश्रण भस्म अधुऱ्या स्वप्नांचे त्यात अश्रुंचे शिंपण कधी माझ्या कवितेचा शब्द निनादे आभाळी कधी धरती विंधतो कधी गुंजतो पाताळी कवितेची ओळ माझ्या कधी फुलांनी वाकते कधी बोलता बोलता गहनाशी झोंबी घेते माझ्या कवितेत जेव्हा फुंकीन मी प्राण नवा तेव्हा तुम्हा रसिकांचा पाठीवरी हात हवा
लेखनविषय:

याद्या 1799
प्रतिक्रिया 9
काव्यरस

आधी विडंबक्विचार डोक्यात आलते. पण उघडल्यानंतर कवीचे नाव वाचले आणि... आता कविता वाचायला घेतो! :) Sandy