Skip to main content

माझ्या कवितेची शाई

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/03/2017 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेची शाई आहे अजब मिश्रण भस्म अधुऱ्या स्वप्नांचे त्यात अश्रुंचे शिंपण कधी माझ्या कवितेचा शब्द निनादे आभाळी कधी धरती विंधतो कधी गुंजतो पाताळी कवितेची ओळ माझ्या कधी फुलांनी वाकते कधी बोलता बोलता गहनाशी झोंबी घेते माझ्या कवितेत जेव्हा फुंकीन मी प्राण नवा तेव्हा तुम्हा रसिकांचा पाठीवरी हात हवा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1802
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान !

आधी विडंबक्विचार डोक्यात आलते. पण उघडल्यानंतर कवीचे नाव वाचले आणि... आता कविता वाचायला घेतो! :) Sandy