Skip to main content

"पॅलेस ऑन व्हील्स "

लेखक पदकि यांनी गुरुवार, 02/02/2017 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
तीन कोटी टिऱ्या* / आभाळ देखती नाके ती टेकती/ धरतीला फाटलेली चड्डी/ शर्ट असे, नसे लढावे ते कसे/ हिवाळ्याशी हातातले त्यांच्या / गंजके खुरपे झपाझप कापे/ गवताला डोक्यावर त्यांच्या /नसे ते छप्पर फुटके खप्पर / आईबाप शाळेमाजी त्यांना/ नसे ते शिक्षण "रात्रीला भक्षण / काय करू?" वाढदिवसाचे / फुगलेले फुगे रंगीत नी झगे / कोठून ते तीन कोटी पोरे/शेतांत राबती भयाण सोबती/ दारिद्र्य ते दुख्खाचीच कढी /दुख्खाचाचि भात जेवोनिया तृप्त / कोणी नसे मधूनच जाई / नवी आगगाडी शहरची जाडी/ पोरेबाळे हाती त्या सर्वांच्या / थंड कोकाकोला ऑर्डरही केला / पिझ्झा मस्त दोन्ही बाजूंमध्ये / नसे तो संवाद आपुलाचि वाद / आपणासी अशा त्या गाडीत / जपूनच बसा खिडकीशी असा/ सदा दक्ष काय त्या पोरांच्या / मनात घुसळे संताप उसळे/ भयानक झूकूनचि बसा/ दारही ते लोटा घालतील गोटा / टकुर्यात xxx (*जसे: बोलू जाता सोपे वाटे, करणी करता टिरी फाटे : : तुकाराम )
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 969
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया