Skip to main content

भक्ष (भयकविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 07/01/2017 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात चालले, चार तरुण मित्र रस्त्यावर नव्हतं, कुणी काळं कुत्रं. त्यांना नाही दिसलं, एकजण फसलं अंधारात चालले, तिन तरुण मित्र चालले होते मस्तीत,आपल्याच बेफिकर एकजण नव्हता, त्यांना नव्हती खबर दोनजण उरले, दोघेही घाबरले "कोण आहे तिकडे?" भेदरून ओरडले अंधारात कोलमडला, एक तरुण मित्र उरलं नाही भान पुटपुटायचं स्तोत्र काय होणार आता,त्याने लगेच ताडलं, चावलं फाडलं अंधारात चालले, चार तरुण मित्र, शोधत होते भक्ष, आठ लाल नेत्र --------------------
लेखनविषय:

वाचने 3133
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

शेवटचं कडवं, अंधारात चालले, चार तरुण मित्र, शोधत होते भक्ष, आठ लाल नेत्र हे समजलं नाही. थोडं सांगता काय? बाकीची कविता सगळी समजलीच आहे.

In reply to by चांदणे संदीप

साहित्यिक जुगलबंदी आवश्यकच असते. त्यामुळे प्रतिभेची घुसळण होते, लेखकांना लिहायला अन वाचकांना वाचायला मजा येते. चौकटींमध्ये अडकलेल्या लेखनाला मोकळा श्वास घेता येतो.

In reply to by जव्हेरगंज

शेवटच्या कडव्याचा अर्थ असा की चार मित्र आता स्वतः भूत बनून भक्ष शोधत आहेत.