ऐक ना साजणे
('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित)
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे
हाक ती साजिरी
तुच माझी सखी
तुच ती सुंदरी..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..
मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे..
उतरले अंतरी.. लाजरे चांदणे..
संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
तुच माझी प्रिया.. तु असे तारिका..
गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका..
पाहता सुर्यही.. लाजला अंबरी..
तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी..
ऐक ना साजणे..
प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..(
*वरील कवितेची रेसिपी*
एक नेहमीचाच प्रश्न
अंडं चालेल पण मग गोडपणा कमी
अर्धा वाटी मध
<h4><ऐक ना भवाने></h4>
<ऐक ना भवाने>
होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने हाक ही दबकी तुच माझी दावणी तुच ती नाटकी. होत ही.. खातरी.. खुपसली खंजीरी.. आठवली भिंगरी.. पाहता ही नुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. मंद ते सम्जणे.. फुंद ते बोलणे.. उमजले नंतरी.. काढते भांडणे.. संगतीने तुझ्या.. नुरली प्रिती उरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. तुच माझी दशा.. तु भासे त्राटीका.. उच्च वादातही.. तु दिसे चंडिका.. पाहता दैत्यही.. लाजला अंतरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..=))
तुच गाजा पट्टी..
छे छे
बरोबर.
=))
=)) फारच हसवलत आज!!!!
याच डंगरीबद्दल चर्चा सुरू आहे
@डंगरी››› लै दिसानी ऐकला
अगाबाबौ.... जबरदस्त हो नाखु
नाखुकाका रॉक्स!
.
पार चोता केला राव चांगल्या
प्रगती आहे !
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच
णवकवींना प्रोतसाहाण दिले
छान लिहिले आहे.
धन्यवाद..
"नाही कळले कधी" हे गाणं आहे?