Skip to main content

शूर नेते

लेखक सोहम कामत यांनी गुरुवार, 17/11/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती) नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. भ्रष्ट सानिध्यात उमगली भ्रष्टाचारी रित.. खुर्चीवर जे बसवले आम्हा जडली येडी प्रित.. लाख पैसे ते चोरून नेईल अशी शक्ती या हाती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती.. खुर्चीवरूनी पैस गिळावं हेच अम्हाला ठावं.. मारून घ्यावं घेऊन खावं हेच अम्हाला ठावं.. काळ्या पैशासाठी भुलवू माया ममता नाती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..

वाचने 1408
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया