✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत

व — वेल्लाभट, Wed, 11/09/2016 - 08:00
ब्लॉग दुवा शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच. आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो. शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे योगेश जाधव, राहुल राऊत, संतोष शिगवण यांनी या गीतासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. सुधारित लिंक - आता फाईल ओपन व्हायला हवी शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत गीत : अपूर्व जयंत ओक गायक : नंदेश विट्ठल उमप संगीत : राहुल रमेश राऊत आणि योगेश जाधव रुद्राचा अवतार हा शिवरुद्राचा अवतार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार गणरायाच्या कृपेने होते सारे साकार शिवशंभूची शक्ती करते ह्रदयांवर संस्कार ऐका ही ललकार ही तरुणाईची ललकार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार नाही जोश वरवरचा हा खेळ नसे फक्त या धमन्यांतून वाहते शिवभक्ताचे रक्त गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार आमची निष्ठा आमची श्रद्धा आमचे शिवरुद्र तुमचे कौतुक तुमच्या टाळ्या तुमचे शिवरुद्र तालाची ही भाषा बोलणारे शिवरुद्र मानाची ओळख आम्हा देणारे शिवरुद्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आम्ही वारसदार ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार याच प्रकल्पासाठी एक आणखी काव्य लिहिलं होतं जे आता सार्वजनिक करायला हरकत नाही. अधोरेखित अक्षरांवर ठेका धरावा a sr

प्रतिक्रिया द्या
7162 वाचन

💬 प्रतिसाद (25)

गीत कुठाय?

आनन्दा
Wed, 11/09/2016 - 15:28 नवीन
गीत कुठाय?
  • Log in or register to post comments

ऑडीयो लिंक आहे ना

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 15:29 नवीन
ऑडीयो लिंक आहे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ऑडीयो लिंक उघडत नाही

सत्याचे प्रयोग
Wed, 11/09/2016 - 15:50 नवीन
ऑडीयो लिंक उघडत नाही
  • Log in or register to post comments

उघडतेय

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 16:28 नवीन
साईन इन केलं नसेल गूगलला तर ते करून बघा. होईल डाउनलोड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

ऐकलं, खूप जबरदस्त!

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 16:09 नवीन
ऐकलं, खूप जबरदस्त!
  • Log in or register to post comments

+११ ऐकले

नाखु
Wed, 11/09/2016 - 16:36 नवीन
उमप म्हणजे तेच ना देवा तुझ्या गाभार्याला उंबराच नाही वाले ? का दुसरे कुठले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाही

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 16:39 नवीन
ते बहुदा आदर्श शिंदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 19:29 नवीन
नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ अख्यानवाले विठ्ठल उमप यांचे सुपुत्र. Image removed. वेल्लाभट यांचे अभीनंदन. ऑडीयो लींक न उघडल्यामुळे गाणे अजून ऐकु शकलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आता बघा. लिंक बदलली आहे.

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 19:42 नवीन
आता बघा. लिंक बदलली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हो आता ऐकू येतेय.

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 20:10 नवीन
हो आता ऐकू येतेय. कोणत्याही चित्रपटात खपून जाइल असे झालेय गाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जबरदस्त! गीत, गायन, संगीत

पद्मावति
Wed, 11/09/2016 - 16:20 नवीन
जबरदस्त! गीत, गायन, संगीत सगळंच टॉपनॉच.
  • Log in or register to post comments

झकास !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/09/2016 - 16:55 नवीन
जबरा, मजा आली. अभिनंदन ओ सेठ तुमचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जबरदस्त

पाटीलभाऊ
Wed, 11/09/2016 - 17:09 नवीन
मजा आली. छान गीत.
  • Log in or register to post comments

मला कसं सापडत नाहीये. ती लिंक

किसन शिंदे
Wed, 11/09/2016 - 17:31 नवीन
मला कसं सापडत नाहीये. ती लिंक सकाळपासून दोनदा उघडून पाह्यली
  • Log in or register to post comments

आता बघा. लिंक बदलली आहे.

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 19:43 नवीन
आता बघा. लिंक बदलली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

वा!

पैसा
Wed, 11/09/2016 - 17:56 नवीन
मस्त जमलय! शब्द पण टाक ना इथे!
  • Log in or register to post comments

वेल डन!

चांदणे संदीप
Wed, 11/09/2016 - 18:41 नवीन
जबरदस्त रचना! सर्व सहभागी ढोल-ताशा वादकांना स्फूर्ती देत असेल यात शंकाच नाही! ...इथे येऊन जरासा अडखळलो.
गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार
क्रिटिसाईज करत नाहीये पण, म्हणजे बघा, हे शब्द इतके मनात रुतून बसलेत, आदरणीय कुसुमाग्रजांच्या "गर्जा जयजयकार क्रांतिचा" या कवितेचे शीर्षक व ध्रुवपद असलेले हे शब्द अगदी उसने आणल्यासारखे वाटले! बाकी, ती ऑडिओ लिंक अजून ऐकायला मिळाली नाहीये पण ऐकायला नक्कीच आवडेल! आणि,
आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो.
याबद्दल अभिनंदन! Sandy
  • Log in or register to post comments

सर्वात आधी

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 19:43 नवीन
सर्वात आधी सूचनेचा स्वीकार करतो. भविष्यात नक्कीच हे टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या कौतुकाबद्दल मनापासून धन्यवाद. :) आता लिंक बदलली आहे. उघडेल आता फाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

डांगेसाहेब, पद्मावतिताई, नाखु

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 18:51 नवीन
डांगेसाहेब, पद्मावतिताई, नाखु, प्राडॉ, पाटीलभाऊ, किसन, पैताई सगळ्यांचे अनेक आभार :)
  • Log in or register to post comments

शिवरुद्रचा लोगो जबरा जमलाय

खटपट्या
Wed, 11/09/2016 - 19:29 नवीन
शिवरुद्रचा लोगो जबरा जमलाय
  • Log in or register to post comments

गीत झकास.. एकदम भारी..!!!

मोदक
Wed, 11/09/2016 - 21:39 नवीन
गीत झकास.. एकदम भारी..!!! फक्त ताशांचा कडकडाट जरा जोरात हवा होता, किंवा कदाचित सगळे एकदम बरोबर असेल पण ढोल ताशा पथकाचे गीत असल्याने मला ढोल ताशांचा भारदस्त आवाज अपेक्षित असल्याने असे मत झाले असावे.
  • Log in or register to post comments

अ‍ॅग्रीड

वेल्लाभट
गुरुवार, 11/10/2016 - 08:34 नवीन
अ‍ॅग्रीड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

वाह वाह ! वेल्लाभट, अभिनंदन

स्रुजा
गुरुवार, 11/10/2016 - 07:17 नवीन
वाह वाह ! वेल्लाभट, अभिनंदन !
  • Log in or register to post comments

स्रुजा मोदक खटपट्या

वेल्लाभट
गुरुवार, 11/10/2016 - 08:34 नवीन
स्रुजा मोदक खटपट्या मनापासून आभार!
  • Log in or register to post comments

आवडेश!!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 11/10/2016 - 09:42 नवीन
आवडेश!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा