Skip to main content

मित्राच्या निमीत्ताने...

मित्राच्या निमीत्ताने...

Published on सोमवार, 29/09/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या मैत्रीणीनी असे काही प्रश्न विचारले नाहीत.पण नंतर जवळ जवळ बारा वर्षांनी आठवण असह्य झाली तेव्हा कविता लिहून मला पाठवली. तुझ्यामागून हिरव्या रानातून चालताना - माझी वाट चुकली, अन् घनगर्द अरण्यात मला माझी - झोपडी बांधावीच लागली. त्यानंतर किती वर्षांनी -- उन्हं माझ्या अंगणात आली, दारच्या त्या ओंडक्यांची -- कोवळी रोपे झाली. गर्द असे हे रान-आणि उन्हे अधीमधी, सावलीतली ही रोपे -वाढतील का रे कधी ? त्यात आता झोपडीचे -एक असे गाव झाले, मनात पालवी असून -रोप बाजूला राहिले. मनातले हिरवे रान-अणि मी झोपी जाते, गर्द रानातली वाट-चालण्यास सोपी जाते. १२-१२-१९९४.
लेखनविषय:

याद्या 3875
प्रतिक्रिया 7
Taxonomy upgrade extras

कवितांवरती प्रतिक्रिया देणं म्हणजे छळ. पण या कवितेला दाद द्यायलाच हवी. तुमच्या मैत्रिणीला कळवा - अप्रतिम.

अत्यंत सुरेख !! बारा वर्षांनी !!!! बापरे .. सलाम !

http://vipravani.wordpress.com/ उन्हे अधी मधी आज का तुमच्या कवितानी माझा गोंधळ वाढला आहे.

काही बोलण्यासारखे शिल्लक नाही.

In reply to by अवलिया

-- मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

एक छोटं पेंटींग पण होतं.शोधून बघतो मिळतंय का ते. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.